रविवार, १५ जानेवारी, २०१२

संपुर्ण जग सुंदर आहे,फक्त तस पहायला हवं


  1. संपुर्ण जग सुंदर आहे,फक्त तस पहायला हवं.
प्रत्येक नातं जवळचं आहे,फक्त ते उमजायला हवं.
प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे,फक्त तस समजायला हवं.
प्रत्येकाकडुन प्रेम आणि जिव्हाळा मिळतो,फक्त निस्वार्थी असायला हवं.
प्रत्येक वेळेत समाधान आणि आनंद आहे,फक्त तस जगायला हवं...!

शनिवार, १४ जानेवारी, २०१२

तुझ्या मैत्रीवर कितीही लिहीलं


तुझ्या मैत्रीवर कितीही लिहीलं

तरी उनं वाटतं
सारं आहे माझ्याकडे आज
तरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतं..


... तुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटु लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटु लागतात..

तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती..

तुझ्या मैत्रीच्या आठवणी
मी आजही जपुन ठेवतो
आनंदाचे ते क्षण हरवु नयेत म्हणुन
काळजाच्या तिजोरीत लपुन ठेवतो..

मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्याशी आजन्म असचं राहील
तुला ठेच लागली कधी
तर पापणी माझी वाहील..
मन माझे वेडे
पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात
अन शब्द माझे कवितेतुन
तुझ्या मैत्रीचा वेध घेतात

शुक्रवार, १३ जानेवारी, २०१२

झाडाला बहरण्यासाठी


हणून जिवनाला ओझे समजू नकोस......


डोळ्यांना पापणीचे ओझे नसते
पक्षाला पंखाचे ओझे नसते
म्हणून जिवनाला ओझे समजू नकोस......

झाडाला बहरण्यासाठी फांदीची गरज असते
फांदीला सुद्धा आधारासाठी बुन्द्याची गरज भासते
म्हणून जिवनाला ओझे समजू नकोस...... ♥♥♥

जन्मलेल्या पिल्लाला उडण्याची आस लागते
झेपावणाऱ्या पक्षाला पंखाची गरज भासते
म्हणून जिवनाला ओझे समजू नकोस...... ♥♥♥

होताच मनाला दुख पाणी डोळ्यात येते
संकटाचे काहूर मनात दाटून लागते
म्हणून जिवनाला ओझे समजू नकोस...... ♥♥♥
अपेक्षांचे ओझे मनावरती घर करून राहते
सुखी मन सुद्धा मग उदासच राहते
म्हणून जिवनाला ओझे समजू नकोस.

गुरुवार, १२ जानेवारी, २०१२

Home Page | SAAMTV

Home Page | SAAMTV

मी हो म्हणलं म्हणुन.


मी हो म्हणलं म्हणुन..तु हो म्हणायलाच पाहिजे, अशी काही सक्ती नाही...

प्रेम काय.! काल होत, आज आहे ,उद्याही होईल..
करायलाच पाहिजे.. अशी काय ती देवाची भक्ती नाही.
मी हो म्हणलं म्हणुन....


तुझ्यात मी आणि तु माझ्यात तुला शोधायचीस,
भेट नाही घडली की, अगदी कासावीस व्हायचीस.
आठवत तुला ते खाली उतलेलं आकाश ,तलावातील चांदणं..
अगदी सुर्य घरी परतल्यावरही,चालु राहिलेलं आपआपसातलं बोलणं..
तुझ्या माझ्या आठवणीखेरीज, हृदयावर कोणाची जप्ती नाही.
मी हो म्हणलं म्हणुन....

काहीनाही फक्त आठवण देण्याकरीता ग,
तुच म्हणायचीस.. स्वप्नात काय.., डोळे उघडे असतांनाही तुच दिसतोस.
माझ्या श्वासा श्वासात, तु अन् तुच भिनतोस..
जाऊ देना..! जास्तीत जास्त काय होईल,
माझा रोल, कुणी दुसरा घेइल.
मीच पाहिजे प्रेमासाठी.. अशी माझ्यात दैवी शक्ती नाही..
मी हो म्हणलं म्हणुन....

आठव तुच म्हणाली होतीस,
मैत्रीचं नातं आता प्रेमात बदलतयं..
तरीही मी ठाम नाही.
चार पावसाळे जाऊ दे..
तुझं सगळं ठरलं की, उत्तर फक्त आणुन दे..
लवकर उत्तर येण्यासाठी ही काही युक्ती नाही
मी हो म्हणलं म्हणुन....

बुधवार, ११ जानेवारी, २०१२

तो एक क्षण तुझ्या बरोबर मारलेल्या प्रत्येक गप्पांचा.


तो एक क्षण तुझ्या प्रत्येक आठवणींचा.

तो एक क्षण तुझ्या बरोबरच्या प्रत्येक सोबतींचा.

तो एक क्षण तुझ्या बरोबर मारलेल्या प्रत्येक गप्पांचा.

तो एक क्षण तुझ्या बरोबर टाकलेल्या प्रत्येक पावलांचा.

तो एक क्षण तुझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिलेल्या प्रत्येक स्वप्नांचा.

तो एक क्षण तुझ्या माझ्यात झालेल्या छोट्या मोठ्या भांडणांचा.
तो एक क्षण तुझी प्रत्येकवेळेला समजूत काढताना झालेल्या दमछाकीचा.

तो एक क्षण तुझ्या प्रेमात अखंड बुडाल्यावर होत असलेल्या धाकधुकीचा.

तो एक क्षण अश्या प्रत्येक क्षणांची आठवण रोज होऊ देणाऱ्यांचा.

तो एक क्षण तो एक क्षण.....

तू अशीच आहेस,


तू अशीच आहेस,

एकटी एकटी जगनारी.....
सर्वात असाताना देखील,
स्वतःहाच्या शोधात फिरनारी.....


तू अशीच आहेस,
खुप प्रेमाने बोलणारी
आपल्या सरळ वागण्याणे ,
कुणालाही सहज आपलसं करणारी .....

तू अशीच आहेस ,
जीवानाच मर्म जाणनारी..
साध्या मैत्रीच्या नात्यालाही,
आपला धर्म माननारी....

तू अशीच आहेस,
दुखाःतही नेहमी हासनारी....
अन हसत हसता
नियतीला लाजवनारी ...

तू अशीच आहेस,
इतरांना सतत प्रकश वाटणारी ....
पण स्वतःहा मात्र,
काळोखात आटनारी .....
तू अशीच आहेस,
सगळ्यांपासुन दुर दुर जाणारी .
जाताना मात्र सगळ्यांच्या मनात
घर एक करुन रहणारी ......

समजवेल माझ्या मनाला


मी समजवेल माझ्या मनाला
तुझ्या आठवनी विसरायला
तु दिलेल्या विरहाला
एकांतात सहन करायला ।

आधि दिलेस बेशुमार प्रेम
आणि आता खोलवर घाव दिलेस
मनाचा माझ्या विचार न 
करता सांग का गं दुर केलेस ?

आज विसरलीस तु त्या 
दिवसांना जेव्हा मी तुझा 
एकांत दुर करायचो
तुझे आश्रु पुसून तूला 
कुशीत घेवून मी पण र

मला ही वाटतं कधी कधी..


मला ही वाटतं कधी कधी...
वाटतं कधी कधी त्या एकट्या
मनाला कुणाची तरी साथ हवी
त्या रडण्याऱ्या डोळ्यांना कुणीतरी
आपल्या हातांनी पुसावं
त्या पहाटेच्या स्वप्नांना खऱ्या
आयुष्याची साथ द्यावी
त्या हरवलेल्या आठवणींना
एकदा तरी हाक मारावी
त्या गुंतलेल्या आयुष्याला
कधी तरी गुंत्यातुन सोडवाव
त्या स्वप्नातल्या मोडलेल्या घराला
एकदा तरी प्रेमाने बांधाव
त्या घरातल्या अबोल भिंतींशी
कधीतरी एकटेपणात बोलाव
मला ही वाटतं ह्या एकटेपणात
कधी कधी एकटच कोपऱ्यात बसुन
थोडस रडावं.......

तुझी आठवण म्हणजे कस्तुरी,


तुझी आठवण म्हणजे कस्तुरी,
कधीच साथ न सोडणारी,
सदैव सोबत दरवळत रहणारी|
पण तशीच हवी हवीशी वटणारी,
सुखात सात देणारी आणि दुख विसरवणारी|
स्वप्ना जुळवणारी आणि,
स्वप्नात रमवणारी|
पण तिथे मनाला सोडवात नाही,
कारण जितकी सुखद तुझी आठवण,
तितकाच पर्तीचा प्रवास असतो माझ्यासाठी|