सोमवार, १ ऑक्टोबर, २०१२

वारा पडला मागे रस्ताही कापला सारा उरली ना सीमा कुठली निघालो मी भरारा मोजली न मी किती फिरत्या चाकांची गति बदलत गेली निसर्गचित्रे दिवस रात्र अवती भोवती अडला ना पाऊस मधे ना नडला वारा हाती होता वेग माझ्या अंगभर पेटता शहारा रस्ता वळवळत गेला चढोतार ही आले गेले दिशानीही दिशा भूल प्रयत्न करून पाहिले चाललो होतो कुठे ना ठिकाना ना ठाव मनात निश्चय एकच पक्का जायचे भरधाव जायचे भरधाव !!

शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१२

मर्मबंध: वारू

मर्मबंध: वारू: जीवन एक वारू कोण लावतो अंगार येथे पेटते भट्टी विलक्षण रोज ठाव तो हाती येतो भेटते वारू विलक्षण रोज काढतो उदरातून एक एक घोट विलक्षण श्वास झिं...

बुधवार, ५ सप्टेंबर, २०१२

चाफा वेडा फुलला.....

ओल्या पापण्यात प्रिये ग 
भाव ओळ सांडला 
केसातल्या फुलांचा 
चाफा वेडा फुलला 
ये अशी जावली जराशी 
क्षण तुझसाठी थांबला !! धृ !!
या मिलनाची रात्र वेडी 
शहरली थंडी उराशी 
बिलगून जा तू अशी 
चांदण्याच्या चंद्र कलेशी
तुझ्याच या बाहुपाशी
श्वास माझा गुंतला !!१!!
कुठली सखे हि वेळ वेडी
बरसून हि सर ओळी
गडगडणार्या त्या नभाची
भिजवून सारी काय गेली
हरलो प्रिये मी , स्वप्न माझे
विरह मनी मी पोसला !!२!!
ये अशी जावली जराशी
क्षण तुझसाठी थांबला
ओल्या पापण्यात प्रिये
भाव ओला सांडला
केसातल्या फुलांचा
चाफा वेडा फुलला





By:- 
चारुहास पोफळी

वेग मंदावला होता...



तुच होतीस का गं....

ति तुच होतीस का गं?
अंगात हिरवा शालु नेसुन,
हातांत हिरवा चुडा,
केसांत माळलेला गजरा,
अन भांगातलं सौभाग्यलेणं
होय तिच तु...
माझ्या स्वप्नांत दिसणारी,
तु... माझं बेरंग आयुष्यात रंग भरणारी,
तु... आयुष्याला नवं ध्येय देणारी,
थोडीशी लाजरी बुजरी,
माझी "गोंडसपरी"
बोल होशील माझी माझी ?अर्धांगी??
लावशील कुंकु माझ्या नावाचं?
जगशील माझ्यासाठी,
अगदी माझीच बनुन?
बस...
अन मी तुझाच...
प्रत्येक जन्मासाठी....
सप्तपदीची सात पाऊले
वचने देखील सात
संकटे सारी जातील विरुन
जर हातात असेल तुझा हात...





By:- 

मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१२

म्हणूनच वेड मन तुझ्याकडे वळाल ......

भर उन्हात फुलणारा 
तो गुलमोहर ....
कसा लाल झालाय ....
सगळ्या गोष्टी सोडून 
स्वतःशीच एकनिष्ठ झालाय 
या गुलमोहराच 
जगन मला कळाल....
म्हणूनच वेड मन तुझ्याकडे वळाल ......

By :- चारुहास पोफळी

सखे माझ्यासाठी रङशील,......

कधीतरी सखे माझ्यासाठी रङशील,
माझ्या या अश्रुंचे महत्व तुला तेव्हा कळतील,
खुप भिजलो तुझ्या आठवणीच्यापावसात ,
तुही मनसोक्त रङण्यासाठी कधीतरीपावसाची बघशील,

तेव्हा सखे माझ्यासाठी रङशील,
माझ्या या अश्रुंचे महत्व तुला तेव्हा कळतील
तुझ्या विरहाच्या उन्हात वेङ्यासारखा चालत होतो,
त्या उन्हात सखे तुझीच सावली शोधत होतो,

तुलाही त्या उन्हाचे चटके बसतील
स्वतःसाठी मग तु फक्त अंधारच शोधशील,
तेव्हा सखे माझ्यासाठी रङशील,
माझ्या या अश्रुंचे महत्व तुला तेव्हा कळतील
कधीतरी सखे माझ्यासाठी रङशील..





By:- 
चारुहास पोफळी