शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१२

रूप हे तुझं मनात भरल....

रूप हे तुझं मनात भरल
वाटेत जेव्हा मी तुला पाहिल
तू जवळ येताच मी तुला मिठीत धरल
प्रेम हे मी तुझ्यावर केल
… सौंदर्यात तुझ्या आड़कुण गेलो
तुला पाहताच मी वेडा झालो
तुझ्याच स्वप्नात सतत राहिलो
तू दिसताच स्वताला विसरूनगेलो
तू तर आहेस माझे जीवन
प्रत्येक क्षणी तुझी मला येते आठवन
तुला पाहून लाजतो दर्पण
तुझ्यासाठी माझे सर्व काही अर्पण……





By:- 
चारुहास पोफळी

एक अनोळखी दिवस....

, आज माझ्याबरोबर चालत होता... बरसणाऱ्या पाऊसात, माझ्याबरोबरच भिजत होता... त्याच बरसणाऱ्या पाऊसात, ती माझ्यासमोर आली... पहिल्याच नजरेत, direct माझ्या ह्रदयात गेली.. ती समोरून जाताना, मी फक्त तिलाच पाहत होतो ... गालातल्या गालात, वेड्यात गत हसत होतो... आजची हि मज्ज्या, त्या अनोळखी दिवसानेही पाहिली... अन परत ती दिसतच, त्या दिवशीची आठवण, त्याने मला करून दिली... तिझी ती गोड छवी, हळूच मला दाखवून दिली.. तिझी ती गोड छवी, हळूच मला... .. दाखवून दिली..

गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१२

सुकवाव दु:ख थोड..

"म्हटलं सुकवाव दु:ख थोड..."

म्हटलं सुकवाव दु:ख थोड, थंडीच्या कोवळ्या उन्हात 
तेवढाच मिळे बदल त्यांना, रोज बिचारे जगती मनात !

आले काही दिवसांकरिता, परी येथून न सुटका झाली
काय करतील बापुडे बिचारे, परतीसाठी वाटच नव्हती !

किती काळ लोटुनी गेला, ना पुढे ना मागे हे सरती
अधांतरी अडकुनिया सारे, कारावासाची सजा भोगती !

नवीन मित्रापरी दु:ख नवे, येऊन एकमेकां भेटत होते
ऐकुनी हाल येथील कैद्यांचे, दु:ख नव्यांना होत होते !

सुकून जातील जखमा ओल्या, होईल थोडी पीडा धूसर
तपतेऊन येण्याआधी, सुकवीन म्हटलं यांना क्षणभर





By:- 
चारुहास पोफळी

विश्वास आता कधीच ठेवणार नाही...

"माझे बालपण कधी, मी अनुभवळेच नाही... बालपणीचे अमृत कधी, मी चाखालेच नाही... निरागस ते क्षण कधी, मी जगलेच नाही... आनंदाचे काही क्षण, आठवणीत उरलेच नाही... आठवून आनंदा व्हावा, असे काही घडलेच नाही... कोमल माझया माननी, प्रेमळ शब्द ऐकलेच नाही... सूर्य उगवला तरी त्या, अंधारची भीती सरली नाही... लैंगिक शोषण होताना, क्षणभर काहीच कळले नाही... त्याला काय बोलतात, समजावून कोणी सांगितले नाही... उमलते फूल कोमेजले तरी, भास कोणालाच झाला नाही... मनातल्या मनात रडत होते, ओठांवर शब्द उलगडलेच नाही... एकटेपणाची सवय झाली, विचारपूसही कोणी केली नाही... सांगताना मनाला खात्री होती, भावना कोणाला समजणारच नाही... ते कटू सत्य बोलण्याची, हिंमत कधीच एकवटाली नाही... खेळ तर चालूच होता, त्रासाला तर सीमाच नव्हती... घरच्या माणसांवर विश्वास होता, विश्वासघात करतील अशी अपेक्षा नव्हती... घरातळ्यांनीच खेळ मंडला, माणसाची जातच समजली नाही... कोणत्याही पुरूष जातीवर,
"

बुधवार, २९ ऑगस्ट, २०१२

माझेच शब्द आज, माझ्याशी रुसले..

माझेच शब्द आज,
माझ्याशी रुसले...

 कल्पनेच्या विश्वात,
 फुगून ते बसले...

त्यांना शोधता शोधता,
बेजार मी झालो...

अन वेडे ते,
क्षितीजावर बसून,
मला पाहून हसले..

माझेच शब्द आज, माझ्याशी रुसले...

तिच्याबरोबर ते,
बोलताना दिसले...

न जणू...
काय बोलन झाला त्यांच्यात...

 जाताना ती मला पाहून हसली,
 अन अबोल तिझ्या नयनाने,
तिझ्या मनातल,
सार काही सांगितले...

 माझेच शब्द आज,
माझ्याशी रुसले...

तेच रुसलेले शब्द,
माझ्या बाजूला येऊन बसले...

कोर्या त्या कागदालाच, पाहत बसलेलो मी...
अन कळलच नाही कधी,

तेच शब्द,
त्याच कागदावर,

कवितेच्या रुपात अवतरले..
कवितेच्या रुपात... ...
अवतरले ...

 By :- चारुहास पोफळी

माझ्या कवितेतून: ***प्रेमात असं काही***

माझ्या कवितेतून: ***प्रेमात असं काही***: मला माहित नव्हतं प्रेमात असं काही होतं जिवापलीकडे मन तिच्याच प्रेमात बेधुंद होतं...! समोरून कोणी हाक दिली तर बकवास वाटतं,...

नव्याने सुरवात करु दे.....

का गं कशाला उगाचं असा त्रास देतेस ? का येतेस दोन दोन क्षणाने माझ्या आठवणीत ? जा ना आता कुठे सावरलोय तुझ्या विरहापासून, सोडून तर गेलीस ना.. मला नव्याने सुरवात करु दे आयुष्याची, मनापासून ईच्छा तर मरणाची आहे.. पण ????? माझ्या आई-वडील मला समोर दिसतायत, त्यांच्यासाठीचं मला आता जगायचं आहे..

मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१२

ჱ°ღ•तू अनोळखी, तरीही जवळची•ღ°ჱ: कोण... मी...??

ჱ°ღ•तू अनोळखी, तरीही जवळची•ღ°ჱ: कोण... मी...??: मी ...तसं म्हणाल तर एकटा..! सगळ्यांत राहून, असंख्य लोकांनी वेढलेला असूनही...एकटा..!! अळवावरच्या थेंबांच्या जातीचा..! सदैव एकटे,अ...

गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१२

माझ्या शब्दांच्या गावात.....: सुंदर जीवन ....या फुलाप्रमाणे बहरलेले........

माझ्या शब्दांच्या गावात.....: सुंदर जीवन ....या फुलाप्रमाणे बहरलेले........: सुंदर जीवन ....या फुलाप्रमाणे बहरलेले....... .

माझ्या शब्दांच्या गावात.....: सुंदर जीवन ....या फुलाप्रमाणे बहरलेले........

माझ्या शब्दांच्या गावात.....: सुंदर जीवन ....या फुलाप्रमाणे बहरलेले........: सुंदर जीवन ....या फुलाप्रमाणे बहरलेले....... .