गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१२
विश्वास आता कधीच ठेवणार नाही...
"माझे बालपण कधी,
मी अनुभवळेच नाही...
बालपणीचे अमृत कधी,
मी चाखालेच नाही...
निरागस ते क्षण कधी,
मी जगलेच नाही...
आनंदाचे काही क्षण,
आठवणीत उरलेच नाही...
आठवून आनंदा व्हावा,
असे काही घडलेच नाही...
कोमल माझया माननी,
प्रेमळ शब्द ऐकलेच नाही...
सूर्य उगवला तरी त्या,
अंधारची भीती सरली नाही...
लैंगिक शोषण होताना,
क्षणभर काहीच कळले नाही...
त्याला काय बोलतात,
समजावून कोणी सांगितले नाही...
उमलते फूल कोमेजले तरी,
भास कोणालाच झाला नाही...
मनातल्या मनात रडत होते,
ओठांवर शब्द उलगडलेच नाही...
एकटेपणाची सवय झाली,
विचारपूसही कोणी केली नाही...
सांगताना मनाला खात्री होती,
भावना कोणाला समजणारच नाही...
ते कटू सत्य बोलण्याची,
हिंमत कधीच एकवटाली नाही...
खेळ तर चालूच होता,
त्रासाला तर सीमाच नव्हती...
घरच्या माणसांवर विश्वास होता,
विश्वासघात करतील अशी अपेक्षा नव्हती...
घरातळ्यांनीच खेळ मंडला,
माणसाची जातच समजली नाही...
कोणत्याही पुरूष जातीवर,
"
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा