वारा पडला मागे
रस्ताही कापला सारा
उरली ना सीमा कुठली
निघालो मी भरारा
मोजली न मी किती
फिरत्या चाकांची गति
बदलत गेली निसर्गचित्रे
दिवस रात्र अवती भोवती
अडला ना पाऊस मधे
ना नडला वारा
हाती होता वेग माझ्या
अंगभर पेटता शहारा
रस्ता वळवळत गेला
चढोतार ही आले गेले
दिशानीही दिशा भूल
प्रयत्न करून पाहिले
चाललो होतो कुठे
ना ठिकाना ना ठाव
मनात निश्चय एकच पक्का
जायचे भरधाव
जायचे भरधाव !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा